fbpx

माढा लोकसभा: तिढा अखेर सुटला; भाजपने ‘या’ युवा चेहऱ्याला दिली संधी

टीम महाराष्ट्र देशा : . सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधूं संजय शिंदे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून माढा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर लोकसभा २०१९ साठी बहुचर्चित अश्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे

भाजपने उमेद्वारांची १२ वी यादी आज जाहीर केली आहे त्यात माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे माढा मतदार संघातून आता राष्ट्रवादीच्या संजय शिंदे आणि भाजपच्या नाईक निंबाळकर यांच्यात अतितटीचा सामना होण्याची शक्यता आहे.

दरम्यान याच मतदार संघातून यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु काही काळानंतर त्यांनी आपण लढणार नसल्याचं जाहीर केले होते.

कोण आहेत रणजितिसंह नाईक निंबाळकर?

रणजितसिंह ना. निंबाळकर हे माजी खासदार हिंदुराव ना. निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत. स्वराज उद्योग समुहाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आपल्याकडे आकर्षित केला आहे. 1996 साली रणजितसिंहांचे वडील हिंदूराव ना. निंबाळकर यांनी शिवसेना – भाजप युतीकडून लोकसभा निवडणूक लढवतसातारा लोकसभा मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला होता.