हार्दिक पटेल हा सीडीप्रकरणी न्यायालय किंवा पाेलिसांकडे दाद का मागत नाही?भाजप 

hardik patel

अहमदाबाद- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि प्रदेशाध्यक्ष जितू वाघाणी यांच्यावर हार्दिक पटेलच्या विरोधात कारस्थान रचल्याचा अाराेप पाटीदार समाजाचे नेते दिनेश बांभणिया यांनी केल्यानंतर पाटीदार अारक्षण अांदाेलन समिती (पास)चा संयाेजक हार्दिक पटेल हा सीडीप्रकरणी न्यायालय किंवा पाेलिसांकडे दाद का मागत नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी पलटवार केला आहे . या सीडी प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध नाही, मात्र अामच्यावर अाराेप केल्यामुळे उत्तर देणे अपरिहार्य ठरले अाहे. सीडीप्रकरणी ‘पास’च्या नेत्यांनी अद्याप न्यायालयात किंवा पाेलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही. पाटीदार समाजाची दिशाभूल करून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हा अकांडतांडव सुरु आल्याचा प्रत्यारोप नितीन पटेल यांनी केला आहे .