‘वास्तवाची जाण नसलेल्या राज्य सरकारचा हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न’, भाजपची टीका

मुंबई : राज्यातल्या पूरग्रस्त आणि अतिवृष्टी बाधितांसाठी राज्य सरकारने मोठी मदत जाहीर केली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. त्यानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात आलेल्या पूरामुळे तसंच अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचं नुकसान झालं. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण मदत जाहीर केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

या मदतीवरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. जाहीर केलेले अर्थसहाय्य निव्वळ दिखावा असून, सत्य परिस्थितीची जाणीव नसलेल्या सरकारचा हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

‘ग्रामीण भागातील शेतकरी बांधव व सामान्य नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी जाहिर करण्यात आलेले अर्थसहाय्य निव्वळ दिखावा असून, सत्य परिस्थितीची जाणीव नसलेल्या सरकारचा हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे असे ट्विट प्रसाद लाड यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या