‘पूजा चव्हाण प्रकरणात गोत्यात आलेल्या संजय राठोडांना मंत्रिपद देण्याची शिवसेनेला घाई’, भाजपची टीका

'पूजा चव्हाण प्रकरणात गोत्यात आलेल्या संजय राठोडांना मंत्रिपद देण्याची शिवसेनेला घाई', भाजपची टीका

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आता सध्या कॉल रेकॉर्डिंगमधील आवाज कुणाचा? या प्रश्नावर येऊन ठेपले आहे. अनेक वेळा विरोधक दावा करतात  की  हा आवाज शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांचा आहे. त्याच बरोबर संजय राठोड यांना मंत्रीपद देण्याची चर्चा देखील सुरु आहे. या विषयावर विरोधक आक्रमक होताना दिसत आहे.

याच विषयाला अनुसरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एक सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले, ‘तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी गोत्यात आलेल्या माजी मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा अभिषेक करण्याची घाई लागलेल्या शिवसेनेला चपराक मिळाली आहे. फोनवरच्या संभाषणातील आवाज राठोड यांचाच असल्याचे उघड झालेय. नैतिक भ्रष्ट लोकांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही धडा मिळालाय.’

दरम्यान, पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात राहत्या घरावरून उडी मारली होती. तिच्या आत्महत्याप्रकरणात शिवसेनेचे माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. भाजपने या मुद्द्यावरुन संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तेव्हा राठोड यांनी २८ फेब्रुवारीला राजीनामा दिला होता. तेव्हापासून पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुणे पोलीसांकडून तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या