Share

BJP on Uddhav Thackeray | सत्तेसाठी हपापलेले उद्धव ठाकरे, अजून किती गद्दारी करणार ; भाजपची टीका

BJP on Uddhav Thackeray |  मुंबई : महाराष्ट्रात सत्तेतून पायऊतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट राजकीय समीकरण बळकट करण्यात व्यस्त आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. बीएमसी निवडणुकीत प्रकाश आंबेडकर शिवसेना (उद्धव गट) एकत्र लढणार असल्याची शक्यता वर्तवीण्यात येत आहे. अशा स्थितीत ही युती भाजप-एकनाथ शिंदे यांना पराभूत करू शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन भाजपाला विरोध करणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आघाडी करण्यास तयार! ही लाचारी नाही तर दुसरे काय?,” असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

“व्होट बँकेसाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची चर्चा होत आहे.  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना दगा देऊन AIMIM पक्षासोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरे हात धरणार का?. सत्तेसाठी हपापलेले उद्धव ठाकरे, अजून कीती गद्दारी करणार,” असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेसह अनेक नागरी संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात लवकरच होणार आहेत आणि त्यानंतर मे 2024 मध्ये लोकसभा आणि नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर आणि शिवसेना दोन गटात विभागल्याने उद्धव ठाकरेंसमोर बीएमसी वाचवण्याचे आव्हान आहे. तीन दशकांपासून बीएमसीवर सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेला हुसकावून लावण्यासाठी भाजप-शिंदे गट एकत्र आला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

BJP on Uddhav Thackeray |  मुंबई : महाराष्ट्रात सत्तेतून पायऊतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट राजकीय समीकरण बळकट करण्यात व्यस्त आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now