Share

BJP | “याला असंवेदनशीलता म्हणायचं की माज?”; उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत भाजपचा खोचक सवाल 

BJP | मुंबई : अनेक नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं, श्रद्धा वालकर हत्त्या प्रकरण (Shraddha Walkar Murder Case) आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद या मुद्द्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. मात्र श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देणं त्यांनी टाळलं. या मुद्द्यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे.

यासंदर्भात भाजपानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. उद्धव ठाकरेंच्या कालच्या पत्रकार परिषदेमधला हा व्हिडीओ ट्वीट केला असून त्यावरून संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

या व्हिडीओमध्ये पत्रकार परिषदेत एका हिंदी पत्रकाराने विचारणा केली की, “श्रद्धानं महाविकास आघाडी सरकारच्या सत्ताकाळात पोलिसांकडे तक्रार केली होती, तेव्हा त्यावर कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे”. हा प्रश्न विचारला जात असताना बाजूला बसलेल्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना कमी आवाजात ‘सोडून द्या’ असं म्हटल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

“संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, तुमच्या लेखी दुसऱ्यांच्या मुलींची काय किंमत आहे? पत्रकारांनी श्रद्धा वालकरबद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. ‘उत्तर देऊ नका, सोडून द्या?’ याला असंवेदनशीलता म्हणायचं की माज म्हणायचा?” असा सवाल भाजपानं उद्धव ठाकरेंना केला आहे.

यानंतर उद्धव ठाकरेंनी या प्रश्नावर सध्या उत्तर न देता नंतर सविस्तर बोलू, असं सांगितलं. “ठीक आहे. हा विषय मोठा आहे, गंभीर आहे. या विषयावर स्वतंत्रपणे बोलू”, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

BJP | मुंबई : अनेक नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं, श्रद्धा वालकर हत्त्या प्रकरण (Shraddha Walkar Murder Case) आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now