fbpx

गंगाधर ही शक्तिमान है ; भाजपाचा पवार- ठाकरेंना टोमणा

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकामंवर टीका करण्यात मागे-पुढे पाहत नाहीत. अशातच आता भाजपने “गंगाधर ही शक्तिमान है” हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, असा टोमणा भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सोमवारी सोलापूरमध्ये सभा घेतली. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर राज ठाकरे हे सोलापूरमधील हॉटेल बालाजी सरोवर येथे पोहोचले तर शरद पवारही उस्मानाबाद येथील सभा संपवून तिथे पोहचले. त्यांच्या एकत्र येण्याचे वृत्त सर्वत्र पसरताच भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करत ‘कर्ता’ आणि ‘करविता’ यांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक आहे कारण “गंगाधर ही शक्तिमान है” हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, असा टोमणा मारला आहे.