”कर्जमुक्तीसाठी लढले कोण आणि श्रेयासाठी मजा मारतंय कोण – उद्धव ठाकरे

सामनामधून भाजपच्या ‘पब्लिसिटीवर’ निशाना

 

वेबटीम : शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावरून संपूर्ण राज्यभर भाजपकडून विशेष प्रशिद्धी अभियान राबवल जात असल्याच दिसत आहे. ठिकठिकाणी भाजपकडून ऐतिहासिक कर्जमाफी म्हणून बॅनर लावण्यात आलेत .  यावरच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ संपादकीयमधून भाजपावर निशाना साधला आहे. आहे. कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा मारतंय कोण?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपस्थित करत भाजपा सरकारवर टीका केली आहे .

राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती विषयावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ”कर्जमुक्तीसाठी लढले कोण आणि श्रेय घेण्यासाठी पानभर जाहिराती देऊन मजा मारतेय कोण. अर्थात श्रेय उपटणे आणि श्रेय लाटणे हा सध्याच्या राजकीय विचारसरणीचाच एक भाग बनला आहे, पण ‘पब्लिक सब कुछ जानती है’ या विश्वासावरच सध्या जग चालले आहे.”, असा टोलादेखील उद्धव यांनी यावेळी लगावला आहे.

You might also like
Comments
Loading...