महिला असूनही निव्वळ राजकारणासाठी तिहेरी तलाकला विरोध केला, भाजपचा सोनिया गांधींवर आरोप

sonia-gandhi-hospitalised-n

टीम महाराष्ट्र देशा- मुस्लिम महिलांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी अखेर ‘तिहेरी तलाक’चा अध्यादेश तयार करण्यात आला असून त्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

या अध्यादेशानंतर तिहेरी तलाक देणे हा शिक्षापात्र गुन्हा ठरणार आहे. केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. त्या महिला असून देखील निव्वळ राजकारणासाठी तिहेरी तलाकला विरोध केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

नेमकं काय म्हणाले रवीशंकर प्रसाद?
“मी पूर्ण जबाबदारीने हा गंभीर आरोप करीत आहे की त्या महिला नेत्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या आहेत, तरीही संसदेमध्ये कायदा संमत करून तिहेरी तलाक संपुष्टात आणण्याला विरोध करण्यात आला. हे निव्वळ मतांसाठी केलेलं राजकारण आहे” असं प्रसाद म्हणाले आहेत.

तिहेरी तलाक कायदा राज्यसभेत पास होवू नये म्हणून कॉंग्रेसमधील नेत्यांचा सत्ताधाऱ्यांवर दबाव

मुस्लीम समाजाने मोदी सरकारचे आभार मानावे- शायरा बानोLoading…
Loading...