महाराष्ट्र रामभरोसेच आहे, हे वारंवार सिद्ध होतंय; आता पुराने यावर शिक्कामोर्तब केलंय’

महाराष्ट्र रामभरोसेच आहे, हे वारंवार सिद्ध होतंय; आता पुराने यावर शिक्कामोर्तब केलंय’

bjp - thackeray

रत्नागिरी : मुसळधार पावसाने कोकणात धुमशान घातले आहे. रत्नागिरीत चिपळूण, पेढे, कर्जत, खेड, संगमेश्वर या ठिकाणी पुरमय स्थिती झाली आहे. तर चिपळूण येथे दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पावसामुळे काही ठिकाणचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. पावसामुळे कोकणात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७२ जण बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण कोकण पाण्यात असून प्रशासन परिस्थिती आटोक्यात आणण्यात अपयशी ठरत आहे. या परिस्थितीला सरकारचा बेजाबदारपणा कारण असल्याची टीका भाजपाने केली आहे.

मुंबई भाजपाने ट्विट करत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘कोकणात पावसानं धुमशान घालत ठाकरे सरकारचं पितळच उघडं पाडलय. सरकारने मदतकार्य सुरू करण्यासही प्रचंड वेळ काढला. महाराष्ट्र रामभरोसेच आहे, हे वारंवार सिद्ध होतंय. कोरोना, वादळ आणि आता पुराने यावर शिक्कामोर्तब केलंय’. असा घणाघात भाजपने ठाकरे सरकारवर केला आहे.

दरम्यान, २००५ नंतर पहिल्यांदाच कोकणात अशी भीषण परिस्थिती झाली आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून उशिरा मदतकार्य मिळाल्याने लोकांनी स्वतः मदतकार्य करत रेस्क्यु ऑपरेशन केले. आमदार उदय सामंत तसेच परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब कोकणाबाहेर असून कोकणी जनता मात्र जीव मुठीत घेऊन या पुराचा सामना करत असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या