कोणीतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे , भाजपने साधला राज ठाकरेंवर निशाणा

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकींचे रण तापले असताना आता राजकीय पक्षांनी एकेमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंवर एक व्यंगचित्र काढत जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी 2014 मध्ये भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रस- राष्ट्रवादीला पाडण्यासाठी साथ द्या अशा घोषणा दिल्या होत्या. मात्र, यंदाच्या म्हणजेच 2019च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ द्या, अशी साद घालत असल्याचे चित्र यामधून दाखवण्यात आले आहे.

 

 

दरम्यान, मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. मनसेच्या निर्णयाने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला असेल. मात्र, मनसेच्या भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेचे झोप उडणार आहे. कारण, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शविला होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी दंड थोपटले आहेत. तसेच भाजपाला पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पक्षांना मदत करण्याचा निश्चय केला आहे