मेहबुबा मुफ्ती काश्मिर नीट सांभाळू शकल्या नाहीत : भाजपा

टीम महाराष्ट्र देशा: जम्मू कश्मीरमध्ये भाजपने पीडीपी सोबत युती तोडली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक झाली. त्यामध्ये आज हा निर्णय घेण्यात आला. मोदींच्या काळात प्रथमच भाजप सत्तेतून बाहेर पडले आहे. मेहबुबा मुफ्ती काश्मिर नीट सांभाळू शकल्या नाहीत असा आरोप देखील भाजप नेते राम माधव यांनी केला आहे. माधव यांनीच युती तोडल्याची घोषणा पत्रकार परिषद घेवून केली .

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जम्मू-कश्मीरचे सगळे मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते यांना बोलावण्यात आलं होत. कश्मीरमधल्या परिस्थितीबाबत या बैठकीत विस्ताराने चर्चा होणं अपेक्षित आहे. मोदी सरकारने पुकारलेली एकतर्फी शस्त्रसंधी, जाँबाज जवान औरंगझेब याची दहशतवाद्यांनी केलेली हत्या, रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारींची दहशतवाद्यांनी केलेली हत्या यामुळे मोदी सरकारवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत होती.या पार्श्वभूमीवर आज हा निर्णय घेण्यात आला.

राम माधव यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

  • जम्मू काश्मिरमध्ये राज्यपाल राजवट लागू व्हावी
  • शांततेऐवजी कट्टरतावाद वाढीस, शुजात बुखारींच्या हत्येमुळे हे अधोरेखित
  • सरकारचे मुख्य नेतृत्व ज्यांच्या हातात आहे ते परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले.
  • पीडीपी-भाजप युतीचे जे हेतू होते, ते पूर्णपणे अयशस्वी
  • मुफ्ती सरकारमधून भाजप बाहेर, अशांत काश्मिरमुळे निर्णय

जम्मू-काश्मीर विधानसभेतील संख्याबळ

पीडीपी – २८
भाजपा – २५
काँग्रेस – १२
नॅशनल कॉन्फरन्स – १५