‘तात्याराव, याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं’

मुंबई : सत्तेवरुन पायउतार झाल्यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा सावरकर यांचा मुद्दा हाती घेत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव मांडण्याच्या मुद्यावर भारतीय जनता पक्षाचा विधानपरिषदेत चांगलीच कोंडी झाली. दिवसभराचं कामकाज झाल्यावर भाजपनं हा प्रस्ताव मांडायचा प्रयत्न करताच उपसभापती नीलम गो-हे यांनी दिवसभराचं कामकाज स्थगित केलं. त्यामुळे विधानसभेत सावकारांच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपला मग कामकाज संपल्यावर प्रतिसभागृह भरवून समाधान मानावं लागलं.

Loading...

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सावरकर गौरव प्रस्ताव फेटाळल्यामुळे विधासभेत एकच गोंधळ उडाला. भाजपा आमदारांनी सभागृहामध्ये मोठ्याने घोषणाबाजी दिली. सावरकर गौरव प्रस्ताव हा नियमांत बसत नाही, असं सांगत नाना पटोलेंनी प्रस्ताव फेटाळला. अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळताच सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाली.

आता यावरूनच भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका करायला सुरवात केली आहे. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर वरून सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील काल्पनिक संवाद दाखवत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘तात्याराव, काय म्हणू आता मी ! मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल.पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं.’ अशा आशयाचा बाळासाहेब ठाकरे आणि स्वा.सावरकर यांच्यातील काल्पनिक संवाद महाराष्ट्र भाजप यांच्या ट्विटर वरून ट्विट करण्यात आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका