fbpx

राज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘संक्रांत’ या व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर, त्याला भारतीय जनता पक्षाने व्यंगचित्राद्वारेच प्रत्युत्तर दिलं आहे.

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर भाष्य करणारे संक्रांत स्पेशल व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले होते.त्यात त्यांनी मोदी संक्रांती निम्मित पतंग उडवत आहेत असं दाखविण्यात आलं होतं. त्या पंतगाला ‘नव्या थापा’ असे शीर्षक देऊन मोदींवर पुन्हा एकदा निशाना साधला होता.

भाजपने रेखाटलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरे ‘राज: एक कटी पतंग’ असा उल्लेख असलेला पतंग उडवत आहेत. त्या पतंगावर राज ठाकरेंकडे असलेले सगळे मुद्दे वापरून संपले आहेत. तरीही बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच आहे, असे भाजपने व्यंगचित्रातून राज ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

मनसेने वेळोवेळी बजावलेल्या भूमिकांचा उल्लेख केलेल्या पतंगाचा खच खाली पडला असल्याचे दर्शवले आहे. तसेच शरद पवार आणि काही ‘नमो रुग्ण’ त्यांना प्रोत्साहन देत आहेत, असे या व्यंगचित्रात दाखवले आहे.