‘राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्या संघाला पंडित नेहरूंनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे आमंत्रण दिले होते’

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा :  नागपूर विद्यापीठाकडून बी. ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल करत अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश केला आहे. दरम्यान या मुद्यावरून महाराष्ट्र कॉंग्रेसने भाजपवर निशाणा साधला. दरम्यान कॉंग्रेसच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

Loading...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)च्या इतिहासाचा समावेश केला आहे. 1885 ते 1974 या कालखंडात भारताचा इतिहास या भागाचा समावेश आहे. हा भाग शिकवताना संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देखील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.

नागपूर विद्यापीठ बीए भाग-२ च्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रनिर्माणातील भूमिका’ शिकवली जाणार आहे. त्यामध्ये आरएसएसने १९४२ च्या चलेजाव आंदोलनाला केलेला विरोध, भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाला केलेला विरोधही विद्यार्थ्यांना सांगावा, अशी आमची मागणी आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हंटले होते. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रनिर्मितीमध्ये संबंध काय?शिक्षण क्षेत्राचा उपयोग संघ विचारधारेचा प्रसार करण्यासाठी केला जात आहे हे निंदनीय आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हंटले.

दरम्यान अशोक चव्हाण यांच्या या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. १९६२ साली भारत-चीन युद्धादरम्यान सीमा क्षेत्रात संघ स्वयंसेवकांनी सैन्याला सर्वतोपरी मदत केली होती. या तत्परतेवर प्रभावित होऊन, ‘राष्ट्रनिर्मिती’त योगदान देणाऱ्या संघाला १९६३ साली प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचे आमंत्रण तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी दिले होते, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे.Loading…


Loading…

Loading...