गोगावले गुरुजींच्या हजेरीत भाजप नगरसेवकांच्या लिखित भाषणांचे ‘प्रकट’ वाचन

yougesh gogavle at pune corporation

पुणे: दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली, आणि गेल्या अनेक वर्षापासून कोथरूड येथील प्रलंबित शिवसृष्टीचा मार्ग मोकळा झाला. आता संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान शिवसृष्टीचा विषय मार्गी लावल्यावर त्याचा ‘इव्हेंट’ करणार नाही ती भाजप कसली.

आज याच विषयावर पुणे महापालिकेत खाससभा बोलावण्यात आली होती. सर्व भाजप नगरसेवक हे खास फेटे बांधून सभागृहात आले. विशेष म्हणजे भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले हेही पत्रकार गॅलरीमध्ये बसून सभागृहाचे कामकाज बारकाईने ‘ऑबजर्व्ह’ करत होते. आता खुद्द हेडमास्तरच सभागृहात आले म्हणल्यावर जुण्याजाणत्या नगरसेवकांसोबत नवीन नगरसेवक हि तडफदार भाषणे करताना पहायला मिळाले. हे होत असताना मात्र अनेकांनी ‘लिहून’ आणलेल्या भाषणाचे ‘प्रकट’ वाचन केले. भाषणे लिखित असताना देखील काहीजण ते वाचताना अडखळल्याचे दिसून आल. तर आपल्या नेत्यांच कौतुक करण्याच्या घाईमध्ये एका नगरसेविकेने चुकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख थेट पंतप्रधान म्हणून करून टाकला. याच सर्व भाषणांची चर्चा विरोधी गोटात तसेच नागरिकांच्या गॅलरीमध्ये सुरु होती.

Loading...

कोथरुडमधील बहुचर्चित शिवसृष्टीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. महापालिकेकडून २००९ मध्ये कचरा डेपोच्या 28 एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. पण, या जागेत मेट्रोचे स्टेशन नियोजित करण्यात आले. त्यामुळे शिवसृष्टीच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र हि बैठक होत नसल्याने माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरसेवक दीपक मानकर यांनी थेट मेट्रोचे काम बंद पडण्याचा इशारा दिला होता. अखेर मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बावधनमधील बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व होत असताना मात्र पुण्यामध्ये श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा