पुणे : चिपळूण येथे पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाहणी प्रसंगी एका पूरग्रस्त महिलेने पोटतिडिकीने आक्रोश करत खासदार, आमदारांचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला आता प्रतिसाद मिळू लागला असल्याचे दिसून येत आहे. आता भाजपच्या नगरसेवकांनी यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांनी १ महिन्याचे मानधन अतिवृष्टीबाधित आणि पूरग्रस्तभागासाठी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
तसेच यासोबतच पुणे महापालिकेच्या माध्यमातूनही विविध पातळ्यांवर मदतकार्य सुरु झाले आहेत. व अडचणीत असलेल्या बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचा आपला प्रयत्न आहे.’ अशी माहिती देखील पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
शिवाय पुणे महापालिकेच्या माध्यमातूनही विविध पातळ्यांवर मदतकार्य सुरु झाले असून अडचणीत असलेल्या आपल्या बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचा आपला प्रयत्न आहे !#BJP4Seva #पुणे #महानगरपालिका #BJP4PMC #भाजपा
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 27, 2021
दरम्यान, राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, अमरावती, सांगली इत्यादी ठिकाणी कित्येक दिवस पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेक हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले आहे. अशा प्रसंगी आपत्तीग्रस्त कुटूंबियांना उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- समान नागरी कायद्याच्या विरोधात काँग्रेस आणि पिलावळ कधी सामील होणार?
- तिकिटासाठी मनसेत येऊ नका, राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना फर्मान
- राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज-यलो ॲलर्ट
- मुख्यमंत्री ठाकरेंच्या आवाहनाला औरंगाबाद युवासेनेची साद; पूरग्रस्तांना केली मदत!
- पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा ; ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर