स्थायी समितीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग: अध्यक्षपदासाठी राजेंद्र शिळीमकर आघाडीवर

पुणे: पुणे महापालिका स्थायी समितीच्या ८ सदस्यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. आज चिट्टीद्वारे स्थायीतून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची नावे काढण्यात आली. यामध्ये विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांच्यासह अन्य तीन भाजप सदस्यांचा कार्यकाळ चिठ्ठीमुळे एका वर्षातच संपुष्टात आला आहे.

महापालिकेच्या आगामी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आता भाजपमधील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याच दिसत आहे. यामध्ये पालकमंत्री गिरीश गिरीश बापट यांचे निकटवर्तीय मानले जाणारे हेमंत रासने, महेश लडकत तसेच जेष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र अध्यक्षपदासाठी आघाडीवर असणारे आणखीन एक नाव म्हणजे राजेंद्र शिळीमकर.

Loading...

निवडणुकीपूर्वी उमेदवार यादीतून अचानक नाव गायब झाल्याने शिळीमकर यांना प्रथम झटका बसला. त्यानंतर  थेट मुंबईत वजन वापरत त्यांनी उमेदवारी मिळवत पक्षांतर्गत विरोधकांना शह दिला. चार टर्म नगरसेवक असणारे राजेंद्र शिळीमकर हे सुरुवातीपासूनच स्थायी समितीसाठी इच्छुक होते. मात्र पालिकेवर सत्ता आल्यानंतरही शिळीमकर यांना लाभाच्या पदापासून जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आल्याच दिसत आहे. याच कारण म्हणजे राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्याशी असणारी जवळीक, दरम्यान गेल्या एक वर्षाच्या काळात पुलाखालुन बरच पाणी वाहून गेल असून काकडे यांच्याशी असणारी जवळीकच आत्ताच्या घडली त्यांच्या फायद्याची ठरू शकते. तर ऐनवेळी अनपेक्षित नावही पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपमधील काही महिला नगरसेविकांनी देखील ‘हम भी किसीसे कम नही’ म्हणत पक्षश्रेष्ठीकडे मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एकूण १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादी कॉंग्रेस चार तर कॉंग्रेस आणि शिवसेनेचे अनुक्रमे १ – १ सदस्य आहेत. दरम्यान ज्या पक्षाचे सदस्य बाहेर पडतात त्याच पक्षाचे नवीन सदस्य स्थायी समितीमध्ये निवडले जातात. त्यामुळे आता स्थायी समितीवर नेमकी कोणाची वर्णी लागणार याबद्दलच्या जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ