पोलिसां समोरच भाजप नगरसेविका पती आणि कार्यकर्ते भिडले

पुणे: विमाननगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर ऐकेरी-दुहेरी वाहतूक राबवण्यासाठी आज पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, ही बैठक सुरू असतानाच स्थानिक भाजप नगरसेविकेचे पती आणि एका संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याच समजतंय. त्यामुळे आक्रमक झालेले माननियांचे पती आणि संबंधीत कार्यकर्त्या एकमेकांच्या अंगावर धावले. प्रकरण वाढण्याच्या आधीच पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही शांत केले त्यामुळे पुढील हाणामारी टळली. मात्र सध्या याच घटनेची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे.

1 Comment

Click here to post a comment