बंदूक साफ करताना चुकून गोळी सुटल्याने भाजपचे नगरसेवक गणेश बीडकर जखमी

पुणे : भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांच्या पायात गोळी लागली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गणेश बिडकर हे त्यांच्याकडे असलेली बंदूक साफ करीत असातना बंदूकीतून गोळी सुटल्याने गोळी पायात लागली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी बीडकर स्वतःच्या घरात बंदूक साफ करत होते. त्यावेळी गोळी सुटून थेट त्यांच्या पायाला लागली आहे. जखमी बीडकर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत

You might also like
Comments
Loading...