fbpx

पुण्यातील भाजप नगरसेवकाने केली आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल

राजेंद्र शिळीमकर

पुणे: बेकायदेशीर कामांची तक्रार केल्याच्या रागातून भाजप नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी आरटीआय कार्यकर्ते शैलेंद्र दीक्षित (47, धनकवडी) यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह आनंद तौर, निलेश देघावकर आणि गिरीष क्षीरसागर यांच्या विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र दीक्षित यांनी शिळीमकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून महापालिकेत चालणाऱ्या बेकायदेशीर कामांबाबत तक्रार केली होती. या गोष्टीचा राग शिळीमकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. दरम्यान, दीक्षित हे 3 मार्च ( शनिवारी) रोजी रात्री शंकर महाराज मठातुन दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर शिळीमकर तसेच तौर, देघावकर आणि क्षीरसागर यांनी त्यांना मारहाण केली. यामध्ये दीक्षित यांच्या डोक्याला तसेच हाताला जबर मार लागला आहे. विशेष म्हणजे मारहाण करणारे नगरसेवक शिळीमकर यांनीच अ‍ॅब्युलन्स बोलावून दीक्षित यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिल्याचं फिर्यादीत सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, शंकर महाराज मठासमोर असणाऱ्या 20 रुपयांत पोटभर जेवण देणाऱ्या सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्याला शैलेंद्र दीक्षित यांनी  जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार आनंद तौर यांच्याकडून करण्यात आली असून दीक्षित यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

2 Comments

Click here to post a comment