भाजपचा फाईलचोर नगरसेवक सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटातून फाईल चोरी करताना भाजपचा नगरसेवक सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. प्रदीप रामचंदानी असं या नागरसेवकाचं आहे.

प्रदीप रामचंदानी हे उल्हासनगर महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटतून फाईल काढून शर्टात टाकून प्रदीप रामचंदानी यांनी चोरली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने समोर आला.प्रदीप रामचंदानी यांचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार आहे.

दरम्यान ही, घटना १0 मे रोजीची असून, मात्र काल रात्री सीसीटीव्हीरमुळे ही घटना उघडकीस आली उल्हासनगर महापालिकेच्या वतीने आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...