मनसेचा राग, पनवेलमध्ये भाजप नगरसेवकाचा मनसे कार्यकर्त्यावर हल्ला

bjp-corporator-beaten-mns-worker-in-panvel

टीम महाराष्ट्र देशा: पनवेलमध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर भाजप नगरसेवकाकडून मनसे कार्यकर्त्याला मारहाणीचा प्रकार घडला आहे. भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांना मारहाण केली आहे. सोमवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घडला आहे.

पनवेल महापालिका निवडणुकीत मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांनी चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडून दिले होते. पैसे पकडून दिल्याच्या रागातून नगरसेवक विजय चिपळेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांना बेदम मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.  ह्ल्यामागे वैयक्तिक कारण सांगितले जात असले, तरी लोकसभा निवडणुकीत मनसेने घेतलेल्या भूमिकेच्या रागातून कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक मनसैनिक करत आहेत.

दरम्यान, कामोठे पोलीस ठाण्यात भाजप नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळेकर आणि त्यांचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांना मारहाण करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या हल्ल्यानंतर चिपळेकर आणि त्यांचे साथीदार फरार झाले आहेत.