भाजप नेत्यांची गुंडगिरी ; पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना आर्थिक मदतीची गरज आहे. सरकारही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाच्या वतीने गेल्या ९  दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी छावणी सुरू आहे. आज या ठिकाणी भाजपच्या नगरसेविका गीता सुतार आणि त्यांच्या गुंडांनी येऊन मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुंडांच्या मारहाणीत एका महिला पत्रकारालाही धक्काबुक्की झाली आहे. तसेच ही  नगरसेविकाने या मदत छावणीमध्ये काही मिळत नाही. असे सांगण्याचा दबाव लोकांवर टाकत होती. पण लोकांनी याला नकार दिला.

दरम्यान, मंत्र्यांचा सेल्फी असो किंवा धान्यावर पोस्टरबाजी हे कमी होत नाही तेच आता भाजपच्या नेत्यांनी पूरग्रस्त भागात गुंडगिरी करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

महत्वाच्या बातम्या