ब्रेकिंग : नक्षलवादी हल्ल्यात भाजप आमदाराचा मृत्यू,पाच जवान शहीद

NAkShAL-ATTACK-

रायपूर – देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर असतानाचा नक्षलवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला आहे. छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित दांतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करून हल्ला घडवून आणला. नक्षलवाद्यांनी ताफ्याला लक्ष्य करून आयईडीद्वारे घडवलेल्या स्फोटात भाजपा आमदार भीमा मंडवी यांचा मृत्यू झाला आहे तसेच पाच जवानांचाही मृत्यू झाला.

दंतेवाडामधील हा हल्ला नकुलनार पोलीस स्टेशन हद्दीतील श्यामगिरी क्षेत्रात झाला. भाजप आमदार भीमा मंडावी निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीही त्यांनी गावोगाव बैठका सुरु केल्या होत्या. नक्षलवाद्यांनी भाजप आमदाराच्या ताफ्यावर पाळत ठेवत स्फोट घडवून आणला.

या हल्ल्यानंतर दंतेवाडा परिसरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. घटनास्थळी अतिरिक्त पथक पाठवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच 11 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाचे पथक आणि अन्य सुरक्षा दल आजपासून मतदान केंद्रावर जाण्यासाठी निघणार आहेत. ही प्रक्रिया पुढील दोन दिवस सुरु राहणार आहे.

Loading...

याआधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी जवानांना दिली होती. यानंतर जवानांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. तरीही दंतेवाडामध्ये नक्षलवादी हल्ला झाल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Loading...

Loading...