विजयाची घोडदौड सुरु ठेवणाऱ्या भाजपला पोटनिवडणुकीत झटका!

१४ पैकी फक्त २ जागांवर विजय

नवी दिल्ली : आज देशात एकूण १४ जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूकिची मतमोजणी पार पडली. यामध्ये लोकसभेच्या ४ जागा तर विधानसभेसाठी १० जागा होत्या. विजयाची घौडदौड सुरु ठेवणाऱ्या भाजपला या निवडणुकीत चांगलाच झटका बसला आहे. भाजपला फक्त २ जागांवर विजय मिळवता आला आहे.

भाजपला पालघर लोकसभा मतदारसंघ व उत्तराखंडमधील थराली लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. तर बाकी सर्व जागांवर काँग्रेस व स्थानिक पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत.

You might also like
Comments
Loading...