fbpx

भाजपमुळेचं बंद पडले उद्योग धंदे-अजित पवार

 बारामती :  जीएसटी आणि नोटांबंदीमुळे महाराष्ट्रतील आणि देशातील काही उद्योग धंदे बंद पडले आहेत. शेतकऱ्यांसह इतर कोणत्याच क्षेत्रातील कामगार वर्ग समाधानी नाही. सरकारला याबाबत गांभीर्य नाही. राज्यातील जनतेचे हाल सुरु आहेत. याला सरकार जबाबदार ठरतंय. अश्या शब्दांत अजित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले. बारामती येथे अजित पवारयांच्या  उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महागाईच्या मुद्यावरून अजित पवार यांनी भाजप सरकार जोरदार हल्लाबोल केला.

विजेच्या  वाढत्या तोट्यामुळे कंपन्यांना वीज चढ्या दराने विकत घ्यावी लागत आहे. सध्या ४० हजार कोटींची थकबाकी आहे. वीजेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शेती आणि उद्योग धंद्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारच्या काळात ५% पासून 18% पर्यंत जी एसटी लावण्याचं विचार होता. परंतु आता भाजप सरकारने तो २८ % वर पोहोचवला. अनेक ठिकाणच्या  एमआयडीसी तील कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजातील सर्व घटकांना फटका बसत आहे. दुधाला दर वाढ दिली जाते मात्र प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नसल्याचं ही अजित पवार म्हणाले.

दुधाला ५ रुपयांची दरवाढ करण्यात आली. त्याचबरोबर परदेशात जाणाऱ्या दुधाला दर वाढ जाहीर झाली. असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांना विचारले असता, अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला नसल्याचे सांगत पवार यांनी सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा यावेळी समाचार घेतला.

राजू शेट्टींच्या मदतीला हार्दिक पटेल ; मुंबईचा दुध पुरवठा रोखणार

कर्नाटकाप्रमाणे काँग्रेसने महाराष्ट्रातही समंजसपणाची भूमिका घ्यावी – पवार