गोगावले गुरुजींच्या हजेरीने मूकनायक ही लागले बोलायला

bjp city president yogesh gogavle at pune corporation

पुणे : शाळेमध्ये असताना अनेक विद्यार्थी वर्गामध्ये शांतचित्ताने बसल्याचे हमखास पहायला मिळते. काही विद्यार्थी शांत असतात तर काही वर्गाकडे फिरकतच नाहीत. अशा विद्यार्थ्यांकडे वर्ग शिक्षकांचे देखील खास काही लक्ष नसते. मात्र कधी वरिष्ठ अधिकारी शाळा चेकिंगला येणार म्हंटल की शांत, दांडीबहाद्दर विद्यार्थी देखील ‘सायलेंट’ वरून ‘ऍक्टिव्ह’ मोडवर येतात. तर शिक्षकही अशा विद्यार्थ्यांचा जास्त नसेल पण थोडा तरी अभ्यास करून घेतात जेणेकरून अधिकाऱ्यांनी विचारलेल्या एक दोन प्रश्नांची उत्तरे देता येतील. आता हे सर्व इथे मांडण्याचे प्रयोजन म्हणजे आज पुणे महापालिकेच्या सभागृहात पहायला मिळालेलं चित्र.

yougesh gogavle at pune manapa
पत्रकार गॅलरीतून सभागृहातील नगरसेवकांची भाषणे ऐकणारे भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले

झालं असं की, पुणे महापालिकेने तयार केलेल्या पर्यावरण अहवालावर खास सभा बोलवण्यात आली होती. मात्र या सभेला महापालिका आयुक्त कुणला कुमार यांच्यासह काही अधिकारी अनुपस्थित असल्याने पर्यावरणाबाबत असणारी प्रशासनाची उदासीनता दिसून आली. तर दुसरीकडे मात्र गेल्या वर्षभराच्या काळात शांत बसणारे भाजप नगरसेवक देखील शहरातील समस्यां आणि पर्यावरण अहवालावर अभ्यासपूर्ण भाषणे करत होते. आणि याला कारण ठरली ती भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची सभागृहातील उपस्थिती.

Loading...

भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापालिकेच्या सभेला आज ‘खास’ हजेरी लावली. पत्रकार गॅलरीमध्ये बसून ते सर्व सदस्यांची भाषणे काळजीपूर्वक ऐकत होते. आता शहराध्यक्षच सभागृहावर ‘वॉच’ ठेवत आहेत म्हंटल्यावर भाजपाच्या सगळ्याच सदस्यांमध्ये बोलण्याची जणू काही स्पर्धाचं लागल्याचं चित्र पहायला मिळाल. गोपाळ चिंतल यांच्या सारख्या जुन्या खेळाडूंनी तर तब्बल एक तास भाषण केले.

महापालिकेवर भाजपची सत्ता येऊन आता वर्ष होत आहे. मात्र आजवर झालेल्या सभांमध्ये आजच्या सारखे चित्र पहायला मिळाल नाही. त्यामुळेच गोगावले गुरुजींच्या हजेरीने ‘मूकनायक ही बोलायला’ लागले असच म्हणावं लागेल. शेवटी शहराध्यक्षांच्या हजेरीने नगरसेवकांत एवढा उत्साह येत असेल तर गोगावले यांनी सर्वच सभांना हजेरी लावल्यास पुणेकरांचे प्रश्न नक्कीच तडीला लागतील.

आमच्या नगरसेवकांचा परफॉर्मन्स सुधारतोय  

भाजपचे शहराध्यक्ष असणारे योगेश गोगावले यांनी देखील कधीकाळी पुणे महापालिकेचे सभागृह गाजवले आहे. दरम्यान आता शहराध्यक्ष झाल्यांनतर आपले नगरसेवक मुख्यसभेमध्ये कशी कामगिरी बजावतात हे पाहण्यासाठी आल्याने याला विशेष महत्व मिळाले आहे. याबदल त्यांना विचारल असता ते म्हणाले कि, ‘पर्यावरण हा पुण्यालाच नाही तर जगाला भेडसावणारा प्रश्न आहे. आपण सर्वानीच त्यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे. महापालिका देखील हि समस्या सोडवण्यासाठी अनेक वर्षापासून काम करतेय. याला गती मिळण्यासाठी नगरसेवकांनी देखील यावर बोलन गरजेच आहे. तसेच हा महत्वाचा विषय असल्याने आपण सभागृहात आलो होतो. आमचे नवीन नगरसेवकही हळूहळू गोष्टी सुधारत आहेत. त्याच्याकडून आज करण्यात आलेली विषय मांडणी चांगली असून काही त्रुटी असल्यास त्या सुधारण्यात येतील’

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली