मोठी बातमी : जळगावात भाजपवर उमेदवार बदलण्याची नामुष्की

bjp-flag-representational-image

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी यापूर्वी कॉंग्रेसने उमेदवार बदलला होता, आणि आता भाजपने देखील जळगाव मतदार संघाचा उमेदवार बदलला आहे. जळगावमध्ये भाजपने विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना डावलून आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. आणि आता स्मिता वाघ यांच्या जागेवर उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवार बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मतदारसंघात राष्ट्र्वादी कॉंग्रेसकडून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ या देवकरांच्या तुलनेत कमकुवत ठरतील त्यामुळे भाजपने चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

दरम्यान, ए. टी. पाटील यांनी बंडखोरी करण्याची भूमिका घेत गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे ए. टी. पाटील यांच्या बंडाचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.