दिल्लीमध्ये भाजप हिंदू-मुस्लिमांमध्ये राजकारण करू शकत नाही, कारण…

blank

टीम महाराष्ट्र देशा – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केनाद्रतीला भाजप सरकारला लक्ष केले आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीत दिल्लीत भाजपामध्ये हिंदू-मुस्लिम राजकारण करण्याची हिंमत नाही आहे, कारण आम आदमी पार्टीने आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे राजकीय चर्चेची दिशा बदलली आहे अस ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना अरविंद केजरीवाल यांनी आम्ही भाजपाला आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यास मजबूर केले आहे. ही मोठी बाब आहे. याचबरोबर, दिल्लीतील प्रत्येक नागरिकाला दिल्ली सरकारकडून लागू करण्यात आलेल्या योजनांचा लाभ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही केलेल्या विकासामुळे पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आम आदमी पार्टीला मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभेचा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आतापासूनचं तयारी सुरु केली आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल हे प्रशासकीय अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी होत राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर आम आदमी पार्टीची स्थापना केली. त्यानंतर विकासाच्या मुद्द्यावर दिल्लीच्या जनतेने त्यांना मोठ्या बहुमताने निवडून दिलेले आहे.

महत्वाच्या बातम्या