‘हा’ बंडखोर मतदारांना म्हणतोय मी भाजपचा उमेदवार

bjp flag

औरंगाबाद: राज्यात युती झाली असली तरीही औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मात्र भाजपच्या नगरसेवक राजू शिंदे  बंडखोरी करत युतीच्या विरोधात निवडणूक लढवत आहे.  शिंदे मतदारांना भुलवण्यासाठी मी भाजपचा उमेदवार आहे. निवडून आल्यावर ही भाजपमध्ये जाईल असे सांगत युतीत खिंडार पाडण्याचा प्रयत्न करत आहे .

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे मानसपुत्र मानले जाणारे राजू शिंदे याने भाजप मधून बंडखोरी केली आहे व शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या विरोधात पश्चिम मधून निवडणूक लढवत आहे. शिरसाट यांच्या वरील नाराजगीचा फायदा घेत शिंदे प्रचार करत आहे . ह्या प्रचारात भाजपची पूर्ण बूथ यंत्रणा बंडखोर शिंदे साठी काम करत आहे.

भाजप पक्षानेही शिंदे वर विशेष मेहरबानी केली आहे सर्व बँड पोरांवर बडतर्फीची कारवाई करणाऱ्या भाजपने शिंदेना मात्र शह दिला आहे. एवढे कमी की काय शिंदे याने भाजपचे दोन रंग आपल्या चिन्हे आणि पोम्प्लेट वर वापरून मतदारांची दिशाभूल करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

मात्र निवडणुकीच्या दोन दिवस आगोदर राजू शिंदे  बडतर्फीचे हालचाली करायला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पूर्णपणे भाजपचे चिन्ह सोडून सर्व कलर वापरण्याचा प्रकार शिंदे याच्याकडून होत आहे याकडे स्थानिक पदाधिकारी खुद्द विधानसभा अध्यक्ष ही दुर्लक्ष करत आहेत.

विशेष म्हणजे जे पी नड्डा यांच्याकडे महापौर नंदकुमार घोडेले यांनी तक्रार करूनही कुठलीच कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. यामुळेच बिनधास्तपणे राजू शिंदे हा  उमेदवारांना सांगतयत  की मी भाजपचा उमेदवार आहे मलाच मत द्या.

महत्वाच्या बातम्या