पुण्यात पुन्हा कमळ फुलले; पोटनिवडणुकीत हिमाली कांबळे विजयी

पुणे: उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमाक २१ मधील पोटनिवडणुकीत भाजप – आरपीआय उमेदवार हिमाली कांबळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. हिमाली कांबळे या नवनाथ कांबळे यांच्या मुलगी आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमाक २१ कोरेगाव पार्क- घोरपडीच्या एका जागेसाठी काल मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढलेल्या हिमाली कांबळे यांना एकूण ७ हजार ८९९ मते तर राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड ३ हजार ४१६ मते मिळाली. यामध्ये हिमाली कांबळे यांचा ४ हजार ४८३ मतांनी विजयी झाला आहे.

 

You might also like
Comments
Loading...