fbpx

पुण्यात राष्ट्रवादीला धक्का; पोटनिवडणुकीत दारूण पराभव

पुणे : पुणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून भाजपच्या ऐश्वर्या आशुतोष जाधव ह्या ३०९५ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना ७१८० मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या रेणुका चलवादी यांना ४०८५ मत मिळाली आहेत.

ऐश्वर्या आशुतोष जाधव यांनी गत महापालिका निवडणूक राष्ट्रवादीमधून लढली होती. यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. कारण काही दिवसांवरच विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत.