डोनाल्ड ट्रम्प आणि हाफिज सईद देखील भाजपमध्ये प्रवेश करतील

सध्या सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हाफिज सईद, दाउद इब्राहीम आणि अण्णा हजारे देखील लवकरच भाजप प्रवेश करतील असा खोचक टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला आहे. काही शिवसेना आमदार भाजप प्रवेश करणार असल्याचा प्रश्न विचारला असता राउत यांनी हे उत्तर दिले.

bagdure

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुका होणार असल्याचं केलेल्या भाकीताबाबत बोलताना पवार यांना निवडणुकीच होकायंत्र म्हणलं जात त्यामुळे सर्व गोष्टी त्यांना लवकर कळतात असे सांगत पवार हे मोदींचे राजकीय गुरू असल्याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच निवडणुकीच्या चाहुलीने भाजपच्या थापा मारण्याची संख्या वाढली आहे. मात्र निवडणूक कधी होईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच सांगू शकतात म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

You might also like
Comments
Loading...