लिंगायतांंना धर्म मान्यता न दिल्यास पश्चिम महाराष्ट्र मराठवाडयात भाजपला फटका – आंबेडकर

blank

टीम महाराष्ट्र देशा : लिंगायत हा वेगळा धर्म नसून हिंदू धर्मातील एक पंथ आहे, तसेच लिंगायतानां धर्म मान्यता देण्याचा विचार नसल्याचं लेखी उत्तर राज्य सरकारकडून विधानसभेत देण्यात आलं आहे. त्यामुळे आता लिंगायत संघटना आणि विरोधकांनी सरकारवर निशाना साधण्यास सुरुवात केली आहे.

संविधानामध्ये सर्वाना आपल्या आवडीनुसार धर्म आचरणाची अनुमती आहे, महात्मा बसवेश्वरांना मानणारा समाज आपल्याला वेगळा धर्म हवा असल्याचं म्हणत असेल तर ही मागणी रास्त आहे. पण लिंगायत धर्म वेगळा झाल्यास आरएसएसला हिंदूची संख्या कमी होण्याची भीती वाटते, त्यामुळेच वेगळ्या धर्मास त्यांचा विरोध असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

स्वतंत्र धर्म मान्यता देण्यासाठी जनगणनेच्या वेळी लिंगायत समाजातील नागरिकांची वेगळी गणना करावी लागणार आहे, आमची भूमिका वेगळ्या धर्माला मान्यता देण्याची आहे. सरकारने देखील लोकांची मागणी ऐकायला हवी, सरकार जर मान्यता देणार नसल्याचं सांगत असेल तर हे चुकीचे आहे, यामुळे भाजपला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात फटका बसू शकतो, असंही आंबेडकर यांनी सांगितले.