Thursday - 19th May 2022 - 8:42 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

सेना-भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे : रामदास आठवले

by
Sunday - 14th October 2018 - 5:43 PM
सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

पुणे : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी परस्परांतील वाद संपवून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी युती करावी. शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे असेल, तर एकत्रित बसून दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घ्यावे, असा फाॅर्म्युला भाजप आणि शिवसेनेला सुचविणार असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच आपण स्वतः दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पुणे शहर यांच्या वतीने रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन विश्रामग्रहात केले होते. यावेळी पत्रकार परिषदेत उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे, पक्षाचे कोषाध्यक्ष एम डी शेवाळे, महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव, राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी,चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष अशोक कांबळे, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, आयुब शेख, महेश शिंदे, महिपाल वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, ‘दक्षिण मुंबई मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपा एकत्र आल्यास सेना ही जागा माझ्यासाठी सोडेल असा विश्वास आहे. सध्या येथे शिवसेनेचे राहुल शेवाळे खासदार आहेत. त्यांना तुम्ही दुसरीकडे उमेदवारी द्या, आमदारकी द्या किंवा मंत्री करा, पण माझ्यासाठी ही जागा सोडा असे मी सांगणार आहे. त्याचबरोबर साताऱ्याची जागाही रिपाइंसाठी सोडावी. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ आणि निवडून आणू. याबाबत उदयनराजेंशी बोलणार होतो. मात्र, ते सध्या दिल्लीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा होऊ शकली नाही.’

भाजपचे चाळीस आमदार आणि सहा खासदार डेंजर झोनमध्ये असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता आठवले म्हणाले, ‘त्या डेंजर झोनमधील मतदारसंघ सुरक्षित करण्याची जबाबदारी माझी असेल. बाळासाहेब आंबडेकर आणि एमआयएम यांच्या युतीची भीती नाही. कारण यांच्यापेक्षा अनेक पटीने माझ्या सभांना गर्दी होते. आंबेडकरांना टाळी देण्यासाठी मी नेहमीच तयार आहे. मात्र त्यांच्याकडून आवश्यक प्रतिसाद येत नाही. आबा बागुल चांगले काम करीत असून गेली ३० वर्षे काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून काम करीत आहेत. त्यांना उमेदवारी मिळायला हवी.’ तिकडे उमेदवारी मिळत नसेल, तर इकडे असे आमंत्रणही आठवले यांनी दिले.

‘गावात मराठ्यांचे दोन गट असतात. त्यातला एक गट दुसऱ्या गटावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावतो. मग ज्याच्यावर केस झाली त्या गटाला हा कायदा चुकीचा वाटतो. त्यामुळे दलितांनी दुसऱ्यांचे ऐकून असे गुन्हे दाखल करू नयेत. मराठा समाज्याच्या मोर्च्यांची चर्चा जगभर झाली. मात्र आता ते आंदोलन हिंसक होऊ लागले आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. मी गेली २५ वर्षे मराठा आरक्षणाची मागणी करत आहे. तसेच आगामी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणार आहे.’असेही आठवले यांनी नमूद केले.

दोषींवर कारवाई व्हावी

सध्या देशभरात उठलेल्या ‘मीटू’च्या मोहिमेबाबत बोलताना आठवले म्हणाले, ‘मिटू’बाबत अनेक व्यक्तींवर आरोपी केले जात आहेत. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी तक्रार करण्याची आवश्यकता होती. केवळ एखाद्याला फसवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये. नाना पाटेकर, एम जे अकबर आणि इतर आरोप झालेले जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास माझा संबंध ‘मीटू’शी नाही, तर युट्यूबशी असल्याचे त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत सांगितले.

राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा – पवार

ताज्या बातम्या

Minister Usha Thakur सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
India

“संस्कारांची कट्टरता शिकायची असेल तर मुस्लिम..”, भाजपच्या महिला मंत्र्याचे वक्तव्य

rohit pawar सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
Maharashtra

“…गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते गप्प का बसतात?”, रोहित पवारांचा प्रवीण दरेकरांना सवाल

Finally Hardik Patels resignation Congresss left hand सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
Editor Choice

…अखेर हार्दिक पटेलांचा राजीनामा, काँग्रेसचा सोडला हात!

sanjay raut सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
Maharashtra

“कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 timing change of ipl 2022 final know at what time match will be played सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
IPL 2022

IPL 2022 : ऐकलं का! आयपीएल फायनलची वेळ बदलली; कोणत्या वेळेत होणार? जाणून घ्या!

सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
Entertainment

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…  

IPL 2022 Final Set To Be Played From 8 PM IST सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
Editor Choice

IPL 2022 : हे कळलं का..? फायनल मॅचबाबत BCCIनं केलाय ‘एक’ बदल; वाचा!

IPL 2022 RCB vs GT Toss and Playing 11 report सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; गुजरात संघात ‘तेजतर्रार’ खेळाडूचं कमबॅक!

IPL 2022 young player in team well played who is your favourite सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
IPL 2022

IPL 2022 : यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ युवा खेळाडूंनी गाजवले मैदान; तुमचा आवडता खेळाडू कोणता?

Most Popular

Navjot Singh Sidhu सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
India

नवजोत सिंह सिद्धू यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
Editor Choice

“ईडीच्या बाबतीत देखील सुप्रिम कोर्टाला निर्णय घ्यावा लागणार”- छगन भुजबळ

IPL 2022 kkr vs srh sunrisers hyderabad playoffs prediction kolkata knight riders सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
IPL 2022

IPL 2022 KKR vs SRH : हैदराबादसाठी प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्याची लढत; एक पराभव बदलेल संपुर्ण समीकरण!

IPL 2022 MI vs SRH SunRisers Hyderabad vs Mumbai Indians match update सेनाभाजपने अडीचअडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे रामदास आठवले
IPL 2022

IPL 2022 MI vs SRH : हैदराबादसाठी ‘करो या मरो’ची लढत; काय सांगते हेड टू हेड आकडेवारी? वाचा!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA