भाजप खासदार नाना पटोले उद्धव ठाकरेंची भेट घेणार 

टीम महाराष्ट्र देशा: भाजप सरकारच्या निर्णयावर उघडपणे टीका करत असल्याने प्रकाश झोतात आलेले खासदार नाना पटोले हे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. कीटक नाशक फवारणीमुळे अनेक शेतकऱ्यांना राज्यात आपला जिव गमवावा लागला आहे. तर सर्व हे सरकारी उदासीनतेने घडवून आणलेले हत्याकांड असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याच मागणीला शिवसेना खासदारांचा पाठिंबा मिळावा यासाठी ते आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर नाना पटोले हे लवकरच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचीही भेट घेणार आहेत.