भाजप नगरसेविकेचे दमबाजी प्रकरण; कामांडोच्या वेषात राष्ट्रवादीकडून निषेध

भाजपचे वर्तन नक्षलवाद्यांप्रमाणे - चेतन तुपे

पुणे: महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्याला भाजप नगरसेवकीने दमबाजी केल्याची घटना काल घडली होती. या नगरसेवकीच्या पतीने आणि कार्यकर्त्यांनी देखील संबंधित अधिकाऱ्याला अरेरावी करत खुर्चीला लाथ मारल्याच्या घटनेचे पडसाद आज महापालिकेच्या मुख्यसभेत पहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी चक्क कामांडोच्या वेषात येत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
bagdure
यावेळी बोलताना विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, ‘भाजपच्या सत्ता काळात अधिकारी सुरक्षित नाहीत. अधिकाऱ्याला करण्यात आलेल्या दमबाजीचा आज सभागृहात जाब विचारला जाईल म्हणून सभा तहकूब केली गेली. नक्षलवादी असल्याप्रमाणे सत्ताधारी भाजपचे वर्तन असून  विकासाच्या गप्पा मारून आलेल्या भाजपला आता विकासाचं कोणतंही देणं घेणं उरलेलं नाही. झालेल्या सर्व प्रकाराचा आम्ही निषेध करतो. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे’
दरम्यान, एकात्मिक सायकल धोरण आणि सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य उपविधीला मान्यता देण्यासाठी बोलावलेली खास सभा तहकूब करण्यात आली आहे.
You might also like
Comments
Loading...