बीडमध्ये भाजप आणखी मजबूत, फुलचंद कराड यांचा प्रितम मुंडेंना पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांचं पारडं आणखीच जड झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रितम मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी मुंडेंना पाठींबा जाहीर केला आहे.

स्व. गोपीनाथ मुंडें यांचे खंदेसमर्थक फुलचंद कराड यांनी काम शिवसंग्राम सोबतच करेन परंतु लोकसभा निवडणुकीत प्रितम मुंडेंना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. प्रीतम मुंडेंना निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करू असा संकल्प फुलचंद कराड यांनी केला आहे. त्यामुळे भाजपला बीडमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांचे विनायक मेटे यांच्या बरोबर मतभेद झाल्यानंतर मेटे यांनी कराड यांची भेट घेतली होती. त्यामुळे कराड राष्ट्रवादीला मदत करतील अशी चर्चा होती. परंतु कराड यांनी घेतलेल्या या निर्णयाचा भाजपला नक्कीच फायदा होणार आहे.