मुंबई : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणूक लागली आहे. त्याअनुषंगाने देशातील निवडणूक लढवणाऱ्या पक्षांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. श्रीमंत पक्षांच्या यादीत भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष सिद्ध झाला आहे. (BJP is the richest political party) तर दुसऱ्या क्रमांकावर बसपा आहे. देशातील सात राष्ट्रीय पक्षांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. भाजपची संपत्ती ४ हजार ८४७ कोटी ७८ लाख असून दुसऱ्या क्रमांकावरील बसपाची ६९८ कोटी ३३ लाख असल्याचे जाहीर केले आहे.
निवडणुकीवर अभ्यास करणारा गट असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ADR नुसार, भाजपने २०१९-२० या वर्षात ४ हजार ८४७ कोटी ७८ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली, जी सर्व राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक आहे. यानंतर बसपने ६९८ कोटी ३३ लाख आणि काँग्रेसने ५८८ कोटी १६ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. २०१९-२० या वर्षात राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या मालमत्ता आधारित हा अहवाल आहे. या अहवालात सात राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेली संपत्ती ६ हजार ९८८ कोटी ५७ लाख रुपये आणि ४४ प्रादेशिक पक्षांनी २ हजार १२९ कोटी ३८ लाख रुपये इतकी आहे.
एडीआरच्या अहवालात नमुद आहे की, सात राष्ट्रीय पक्षांपैकी भाजपकडे सर्वाधिक ४ हजार ८४७ कोटी ७८ लाख रुपये म्हणजेच इतर पक्षांच्या तुलनेत ती ६९.३७ टक्के आहे. बसपाकडे ६९८ कोटी ३४३ लाख रुपये ९.९९ टक्के आणि काँग्रेसकडे ५८८ कोटी १६ लाख ८.४२ टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या