‘माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला’

टिम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर मुंबई अध्यक्षपदी आमदार मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने काल याबाबतचं पत्र जारी केलं. केंद्र सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर आशिष शेलार यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान,भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यानंतर पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे फेसबुकववर पोस्ट करून आभार मानले आहेत.

रावसाहेब दानवे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी – 

Loading...

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पाच वर्षे पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी आभारी असून या कालावधीत भाजपाला राज्यात पंचायत ते पार्लमेंट या सर्व स्तरावर पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो.

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांनी 6 जानेवारी 2015 रोजी माझी प्रथम भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्ष संघटनेची जबाबदारी मी स्वीकारली होती. त्यानंतर 18 जानेवारी 2016 रोजी पक्षांतर्गत निवडणुकीत एकमताने व बिनविरोध प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड झाली. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाला. त्यामुळे आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 23 जागा जिंकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवला.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्याला पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या परीश्रमामुळे भाजपाला पंचायत ते पार्लमेंट या सर्व पातळ्यांवर निवडणुकीत पहिला क्रमांक मिळाला. राज्यातील तिसऱ्या व चौथ्या स्थानावरून पक्षाने झेप घेतली. त्यासोबत पक्षाचा संघटनात्मकदृष्ट्या प्रचंड विस्तार झाला. समाजाच्या सर्व घटकातील लोक भाजपाशी जोडले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता, भाजपाच्या केंद्र सरकारचे काम, मा. अमित शाह यांचे संघटन कौशल्य आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे काम यामुळे भाजपाला यश मिळाले. भाजपाला यशस्वी करणाऱ्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. या सर्व काळात राज्यातील जनतेने भाजपाला भरभरून आशिर्वाद दिला, त्यांचाही मी आभारी आहे.

आपला

रावसाहेब पाटील-दानवे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’