‘उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना अयोध्येला घेऊन जावे’

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत याच स्वागतच आहे, त्यांनी राहुल गांधी यांनाही सोबत घेऊन जावे असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंना दिला. एकीकडे शिवसेनेला सल्ला देतानाच राज ठाकरे यांनी नकारात्मकता सोडावी असा दुसरा सल्ला पाटील यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, की मनसे हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणार असेल तर आमच्याकडून स्वागतच आहे. परप्रांतीयांचा द्वेष करणं योग्य नाही, ती विचारधारा राज ठाकरेंना सोडावी लागेल. भाजप मनसे एकत्र येण्याच्या मुद्द्यावर बोलताने पाटील म्हणाले काळाच्या ओघात काय घडेल ते बघू  मात्र राज यांनी नकारात्मकता सोडावी.

Loading...

संजय राऊत यांच्या विधानाचा संदर्भ देत पाटील म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करणाऱ्यांना कोठडीत डांबावे, मग आता राहुल गांधींना कोठडीत डांबावे.

तसेच मनसेच्या नव्या ध्वजाबद्दल ते म्हणाले, राजमुद्रेवरून गदारोळ उठवणे योग्य नाही, संभाजी ब्रिगेड यांनी राज ठाकरेंशी याबाबत चर्चा करावी.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...