भाजप-सेना केवळ सत्तेसाठी आणि पैसे खाण्यासाठी एकत्र; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

Devendra fadnavis vs munde vs uddhav

मुरुगड: भाजप-सेना केवळ सत्तेसाठी आणि पैसे खाण्यासाठी एकत्र आहेत. हे आता जनतेला कळून चुकले आहे. यांना धडा शिकवल्याखेरीज जनता राहणार नाही. असे बोलत धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजप युवतीवर जोरदार हल्लाबोल केला.

धनंजय मुंडे म्हणाले, सत्तेमुळे भाजप आणि शिवसेनेला मग्रुरी आली आहे. जे स्वतः भ्रष्टाचारी आहेत त्यांना आमच्या आंदोलनावर टीका करण्याचा अधिकार नाही. पाच मंत्रीपदे शाबूत ठेवण्यासाठी खालच्या पातळीचे राजकारण करण्याची दुर्दैवी वेळ शिवसेनेवर आली आहे.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, सत्तेचा वाटा घ्यायचा आणि आपल्या मित्र पक्षावर टीकाही करायची ही शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना दोघे बरोबरचे दोषी आहे. सत्तेला लाथ मारण्याची धमक शिवसेनेत नाही.