मुख्यमंत्र्यांच्या जमीन घोटाळ्यात भाजप नेत्यांनी दलाली केली – संजय निरुपम

sanjay-nirupam

मुंबई :  देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच मुंबईतील सिडको जमीन घोटाळा झाला आहे. भाजपाच्या दिल्लीतील बड्या नेत्यांचेही यात हात गुंतले असून, भाजपा नेत्यांनी या व्यवहारात दलालीचे काम केले असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. ते मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

पुढे बोलताना निरुपम म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच सर्व व्यवहार झाले आहेत.आता स्वत:चा बचाव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ती जमीन सिडकोची नसल्याचा दावा केला आहे. मात्र ती जमीन सिडकोचीच आहे. मुख्यमंत्री फडणवीस विधिमंडळात खोटी माहिती देत असून, त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागायला हवी. कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेली जमीन सिडकोचीच आहे. १९७१ च्या शासन निर्णयात तसा स्पष्ट उल्लेख असून राजपत्रातही त्याची नोंद करण्यात आली आहे. शिवाय, सिडकोने वेळोवेळी पत्र पाठवून जमीन हस्तांतरित करण्याची मागणी केली होती, असे सांगत निरुपम यांनी याबाबतची कागदपत्रे देखील पत्रकार परिषदेत सादर केली.

दरम्यान त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आपली बाजू मांडत आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे निराधार असल्याचे सांगत जमीन घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीची तयारी दर्शवली. तसेच आपल्यावर खोटे आरोप केल्याने विधानसभा विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.

लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपने सुरू केले -विखे पाटील

वजुभाई वाला निष्ठावान कुत्रा; निरुपमांची जीभ घसरली