भाजपचे सरंपचांपासून आमदारांपर्यंत सर्वच नेते एका महिन्याचं वेतन दान करणार’

blank

टीम महाराष्ट्र देशा- पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातली पूरग्रस्त गावं दत्तक घेण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश भाजपनं घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. त्यांनी सरंपचांपासून तर आमदारांपर्यंत पक्षाच्या सर्वच नेत्यांना आपलं एका महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी दान करण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. तेथील जनतेच्या बचावासाठी सरकारने प्रभावी काम केले आहे. पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनाचे अवघड आव्हान आहे. ते पेलण्यासाठी भाजपाने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाटील यांनी भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना निधी संकलनाचे आवाहन केले आहे.

सोमवारी पक्षाचे सर्व खासदार, आमदार, महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन देण्याची सूचना केली. सर्व लोकप्रतिनिधींनी ‘भारतीय जनता पार्टी, आपदा कोष’ नावाने आपले चेक किंवा ड्राफ्ट द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी किमान शंभर रुपये तर कमाल हवे तितके योगदान पक्षाकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा करावे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुर ओसरल्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या अनेक भागांचा वीजपुरवठा आज सुरू करण्यात आला. कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळं १ लाख ४८ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी ८० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे. ग्रामीण भागातून येणारी भाजीपाल्याची आवकही कमी झाली आहे. सरकारकडून मिळणारी मदत ही खऱ्या गरजू लोकापर्यंत पोचली पाहिजे अशी अपेक्षा जनतेतुन व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या