भाजपने सोलापूर मतदारसंघात प्रकट केला नवा ‘देव’

टीम महाराष्ट्र देशा – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता भाजप पक्षाने सोलापूर मतदारसंघात नवीन देव प्रकट केला आहे. निवडणुकीच्या काळात सरकारने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या सुट्टांच्या काळात लोकांनी देव दर्शनाला न जाता या देवाचे दर्शन घ्यावे असा आवाहन सोलापूरच्या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराने केले आहे.

भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांची भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांमध्ये भर पडली आहे. त्यांनी एक मजेशीर विधान केले आहे. ते म्हणाले, सुट्टीच्या काळात देवदर्शनाला जाऊ नका. देव तुमच्याशी बोलणार नाही, मी तुमचा बोलणारा देव आहे, असे विधान सिद्धेश्वर स्वामी यांनी केले आहे.

जय सिद्धेश्वर म्हणाले की, निवडणुकीच्या काळात सुट्टी आहे. सुट्टीच्या दिवसात देवदर्शनाला जाऊ नका. देवाला गेलात तर तुम्हाला पुण्य मिळणार नाही. देव भेटणार नाही, भेटला तर तुमच्याशी बोलणार नाही, बोलला तर म्हणेल आल्या पावली पत जा. तुमचे पैसे खर्च होतील, परंतु समाधान मिळणार नाही. देवाला जा-देवीला जा, कुठेही जा, तुळजाभवानीला जा किंवा पंढरपूरला जा, तिथे देव भेटणार नाही, तो बोलणार नाही. पण बोलणारा देव मी आहे.

जय सिद्धेश्वर यांच्या या विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विधानावर भाजपकडून सारवासारव केली जात आहे. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना टीका करण्यासाठी हे आयतं कोलित हाती मिळालं आहे.Loading…
Loading...