उमदेवारी नाकारल्यानंतर भाजपने खडसे, तावडेंना दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

टीम महाराष्ट्र देशा:- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने चार उमदेवारांच्या याद्या जाहीर केल्या. पण या चारही याद्या मध्ये माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे व उच्च तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उमदेवारी नाकारण्यात आली.

परंतु उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपने स्टार प्रचारकांची नावे जाहीर केले असून एकनाथ खडसे 25 व्या क्रमांकावर तर विनोद तावडे 27 व्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान निवडणूक प्रचारासाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. भाजपच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.

तसेच या यादीत चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशीष शेलार, रणजीत पाटील, विजयराव पुराणिक, पूनम महाजन-राव, विजया रहाटकर, माधवी नाईक, सुजितसिंग ठाकूर, पाशा पटेल, भाई गिरकर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...

Loading...

Loading...