युती तुटल्यास भाजपा–शिवसेनेचा पराभव अटळ : मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवू, असे शिवसेनेने म्हटले असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. भाजपा व शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष असून दोन्ही पक्षांची विचारधारा समानच आहे, असे सांगत त्यांनी शिवसेनेला युतीसाठी साद घातली.

हिंदुस्थान टाईम्सच्या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले, “जर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढत असेल आणि शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा फटका आम्हा दोघांनाही (भाजप-शिवसेना) बसेल. मतांचं विभाजन होईल. त्यामुळे विरोधी पक्षांना त्याचा फायदा होईल. आम्हाला फटका बसेलच पण शिवसेनेला जास्त फटका बसेल. त्यामुळे युती करुन निवडणुकीला सामोरं जाणं फायद्याचं ठरेल.

आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. जर आम्ही स्वतंत्र लढलो तर आमच्या 3-4 जागा इकडे-तिकडे कमी होतील. पण सध्याच्या घडीला देशपातळीवर युती टिकवणं आवश्यक आहे. शिवसेना आमचा जुना मित्र आहे, आमची विचारधारा सारखी आहे. त्यामुळे युती गरजेची आहे”.

हे काय शहाणपणाचं लक्षण नाही ; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

You might also like
Comments
Loading...