युतीसाठी भाजप – शिवसेना सज्ज , २५ – २३ फॉर्म्युला निश्चित

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीबाबत गेल्या काही दिवसांपर्यंत अनिश्चितता होती पण आता युती नक्कीच होणार असल्याच स्पष्ट होत आहे. कारण येत्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याच सूत्रांकडून पुढे येत आहे. भाजप लोकसभेला २५ जागा स्वतः कडे ठेवणार आहे तर शिवसेना २३ जागांवर लढणार आहे. तसेच विधानसभेसाठी देखील या दोन्ही पक्षांनी समझोता केला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा १४५ , आणि शिवसेना १४३ जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या युती संदर्भात बोलणी करण्यासाठी भाजपकडून  नितीन गडकरी, राजनाथ सिंह,आणि अमित शहा  हे दिल्लीच्या दरबारातील ३ बडे नेते मातोश्री येणार आहेत.

दिल्लीच्या दरबारातील या ३ बड्या नेत्यांसमोर युती मधील जागा वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. शिवसेना भाजपच्या अनेक जागांवर हक्क सांगत आहे पण भाजप या जागा सहज सोडणार  की स्वतःकडे ठेवणार हे चर्चेचे ठरणार आहे. त्यामुळे नेमकी कोणती जागा कोणाला मिळणार, याबद्दल उत्सुकता आहे.

दरम्यान मधल्या काळात शिवसेना आणि भाजप यांच्या युती बाबत अस्पष्टता होती. तर शिवसेना ही नेहमीच सरकारमध्ये असून देखील भाजपच्या विरुद्ध भूमिका घेत असे. शिवसेना ही त्यांच्या तत्वांवर ठाम असल्याने या विरोधी भूमिकेत असल्याच शिवसेनेकडून सांगण्यात येत होत. पण आता निवडणुकींच्या रणधुमाळीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांची मदत घेणार असल्याच दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना-भाजप युती व्हावी अशी शिवसेनेच्या खासदारांकडून इच्छा व्यक्त केली जात होती आणि त्या संदर्भात शिवसेनेने मातोश्री वर बैठका देखील घेतल्या होत्या पण आता दोन्ही पक्ष युतीसाठी पुढे सरसावले आहेत.