भाजप आणि शिवसेनेने एकत्र येणे ही काळाची गरज; अन्यथा फायदा काँग्रेसला- चंद्रकांत पाटील

भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचे काम

कोल्हापुर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. तसेच आता होत असलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आमने-सामने आहेत. त्यामुळे कधीकाळी घनिष्ट मित्र असलेले भाजप-सेनेची यापुढे युती होणार कि नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप-शिवसेना युतीवर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. भाजप आणि सेनेने एकत्र येणे ही काळाची गरज आहे, अन्यथा याचा फायदा काँग्रेसला होईल. काँग्रेसची सत्ता कशी असते याचा कटू अनुभव लोकांनी घेतला आहे. ही वेळ पुन्हा जनतेवर येऊ नये यामुळे भाजपा शिवसेनेशी युती करण्यासाठी अगतिक आहे, अशे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली तव्हापासून भाजप शिवसेनेला गोंजारण्याचे काम करीत आहे. यामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आणि आता चंद्रकांत पाटील यांनी भाजप आणि सेनेने एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.

You might also like
Comments
Loading...